सेवा सदन दिलासा केंद्र लक्ष्मी रोड येथे शाळा प्रवेशोत्सव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक, पालक, संस्थेच्या सहसचिव, माजी नगरसेविका मा. श्रीमती अश्विनी कदम उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांचे औक्षण केले. दामिनी पथकांतील पोलिसांनी स्वागत, पहाणी केली. विद्यार्थ्यांचे मनोरंजन डोनाल्ड डक या कार्टून बाहुल्याने केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.