गुरुपौर्णिमा

सेवासदन दिलासा केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

सेवासदन दिलासा केंद्रात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती धुमाळ मॅडम यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विकास पवळे सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विश्वविक्रमी विनोदी कलाकार श्री. डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या विविध विनोदी कृती, अभिनय व मनोरंजनातून विद्यार्थ्यांना मनमुराद हसवले.  विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवून त्यांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

श्रीमती मधुकरनिका सासवडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांसाठी सुंदर गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.  काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले. गुरु-शिष्य नाते, गुरुंचे जीवनातील महत्त्व आणि गुरुंप्रती आदर व कृतज्ञता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम आनंद, हास्य, संगीत आणि गुरुंप्रती कृतज्ञतेच्या भावनेने उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. जमदाडे सर यांनी केले.

 

गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप,
गुरु म्हणजे संस्कारांची शिदोरी,
गुरु म्हणजे जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक! 
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 

Scroll to Top