नेत्र तपासणी शिबिर

सेवासदन दिलासा केंद्रात विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न दि. ६ व ७ ऑगस्ट २०२६ सेवासदन दिलासा केंद्र येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत रोटरी क्लब, इनर व्हील क्लब ऑफ पूना डाऊन टाऊन व कम्युनिटी आय केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती खिलारी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री. विकास पवळे सर यांनी केले.


प्रमुख उपस्थिती :
🔹 संस्थेचे सचिव श्री. चिंतामणी पटवर्धन सर
🔹 सहसचिव श्रीमती शहाणे मॅडम
🔹 संस्थेच्या सदस्या श्रीमती स्मिता फाटक मॅडम

 

प्रमुख पाहुणे :
🔹 डॉक्टर गोगटे सर
🔹 डॉक्टर भाग्यश्री गोगटे
🔹 शिखा मित्र – रोटरी क्लब
🔹 नूतन वाखले – इनर व्हील क्लब
🔹 डॉक्टर खळदकर – कम्युनिटी आय केअर फाउंडेशन
🔹 तसेच इतर सहकारी डॉक्टर व स्टाफ उपस्थित होते.

 

या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य, दृष्टीची गुणवत्ता याबाबत डॉक्टरांनी तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान मिळाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य श्री. विकास पवळे सर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व कौतुकास्पद ठरला. “निरोगी डोळे – निरोगी भविष्य!”

Scroll to Top