जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत सेवा सदन दिलासा शाळेचे यश! दिनांक : ११ व १२ ऑगस्ट २०२६ बाल कल्याण संस्था येथे दिनांक ११ व १२ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सेवा सदन दिलासा शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याची उत्कृष्ट छाप पाडली.

 

ऑटिझम गटातील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश :
🏅 तनिष्का राऊत — मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक. उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला मेडल प्राप्त झाले.
🏅 शौर्य धुमाळ — मुलांच्या गटात चौथा क्रमांक
🏅 तनिष तांबवे — मुलांच्या गटात पाचवा क्रमांक

 

या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सेवा सदन दिलासा शाळेचा मान उंचावला. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य विकास पवळे सरांनी सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी श्रीमती वाळके मॅडम श्री तिरमुखे सर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे हार्दिक अभिनंदन!  “योगातून आरोग्य, शिस्तीतून यश आणि प्रयत्नातून प्रगती!”

Scroll to Top