अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी


सेवासदन दिलासा केंद्रात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रज्ञा खिलारी मॅडम यांनी केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती वाळके मॅडम यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्याची व सामाजिक योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. त्यांच्या विचारांचा व कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती धुमाळ मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. 

Scroll to Top