आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सेवासदन दिलासा केंद्र येथे आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
प्राचार्य विकास पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
वळके मॅडम यांनी योगाचे महत्त्व, योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक फायदे, तसेच निरोगी आणि आनंदी जीवनासाठी योगाची आवश्यकता याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
यावेळी विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सर्व शिक्षकांनी स्वतः योगासने करून दाखवत विद्यार्थ्यांकडूनही योगासने करून घेतली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाचे महत्त्व आत्मसात केले. 
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला.
“योग हा निरोगी जीवनाचा पाया आहे” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

Scroll to Top