हेमांगी हसते तेव्हा
दिलासा ही आमची विशेष मुलांची शाळा ६ ते १८ वयोगटातल्या अनेक मतिमंद, गतिमंद ऑटिस्टिक असे अनेक बौद्धिक विकार असणाऱ्या मुलांची लहान मोठ्या मुलांची एकत्र बालवाडीच होती असं म्हणलं तरी चालेल !! फक्त बालवाडीत कशी साजरी गोजिरी बाळ येतात आम्ही मात्र वेदनेच्या महापुरात क्वचित आढळणारे आनंदाचे झरे शोधत रहायचो. खरंतर पालकांच्या डोळ्यातले हे असहाय्यतेचे भावव ‘दिलासा’ च्या निर्मितीचे मूळ कारण होते.
शाळा हे सोपे सुटसुटीत नाव दिलासाला असले तरी ते एक संगोपन केंद्रच आहे. मुलांची मनोवृत्ती, मुलांचा कल, क्षमता लक्षात घेऊन जमेल तितके व्यवहार ज्ञान देण्याचा आम्हा शिक्षकांचा अविरत प्रयत्न असतो.
जून महिना आमच्या शाळेतही नव्या प्रवेशाचा, नव्या विद्यार्थ्यांचा, धावपळीचा असतो. अशाच एका वर्षी हेमांगीने आमच्या शाळेत प्रवेश घेतला. हेमांगी हायड्रोसीफॅलीची केस होती. मेंदू भोवती पाण्याचा थर वाढल्याने डोके मोठे झालेले, कपाळ पुढे आलेले, बुद्धीचा स्तर अतिशय मागासलेला. तिचा रंग मात्र गोरापान ओठ लाल चूटुक, निर्विकार चेहरा आणि गारगोटी सारखे थिजलेले डोळे. डोळ्यात कोणत्याही भावनेचे प्रतिबिंब नाही. हेमांगीची चणही लहान होती. नऊ-दहा वर्षाची हेमांगी पाच सहा वर्षाची दिसत असेल !! पायात दोष असल्याने एक पाय ओढत फेंगडे चालायची. या विद्यार्थिनीवर बरेच काम करावे लागणार याची खूणगाठ तिला पाहताच मी मनात बांधली.
नव्या शाळेत नव्याने आलेली मुले सुरुवातीला खूप रडून गोंधळ घालतात, आईच्या मागे धावपळ करतात, काही मुले वातावरणाला बुजून घाबरून रडविली होतात, एखाद्या कोपऱ्यातच बैठक मांडतात पण हेमांगी या कोणत्याही मुलांच्यात सामावली नाही आल्या दिवसापासून एकटीच शांतपणे खरं तर निर्विकार पणे तिच्या
वर्गात बसून राहिली. ना कधी खेळायला पुढे आली, कधी नाच गाण्यात सहभागी झाली. शाळेच्या पहिल्या घंटेला तिचे वडील शाळेच्या दारातील सेविकेकडे तिला सोपवून जात. शाळा सुटल्यावर रिक्षावाल्या काकांबरोबर ती घरी जात असे. तिला शाळेत येण्याचा ना आनंद वाटत होता ना तिला त्रास होत होता. ना रडणे, ना ओरडणे काही नाही आमच्या साठे बाई तिला फिलॉसॉफर-तत्वज्ञ म्हणत, तर मदतनीस मीना तिला संत सखू म्हणून हाक मारत असेल. कोणी काही म्हणा थंडपणा नुसता शांतपणा नव्हे हा हेमांगीचा स्थायीभाव होता.
शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मुलांच्या आजारपणाचे कारण, मनोविकार असणाऱ्या मुलाचे कुटुंबातले स्थान, आत्तापर्यंत केलेला औषध उपचार या साऱ्याचा अभ्यास करण्याचा आम्हा शिक्षकांचा प्रयत्न असतो या सर्वांसाठी ही ‘होम विजिट’ खूप उपयोगी पडते. माझ्या शाळेतल्या सर्व शंभर मुलांची त्यांच्या घरी जाऊन असे अहवाल आमचे शिक्षक तयार करतात यामुळे शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या कुटुंबाचा मला चांगला परिचय होता.
हेमांगीच्या आईचे निधन हेमांगी एक दीड वर्षाची असताना झालं होतं. तिची काकू आणि आजी तिचा सांभाळ करत असत एका आईविना असणाऱ्या मानसिक अपंग मुलीचं आयुष्य कसं असणार तिचा दिनक्रम कसा असणार? आपल्या डोळ्यापुढे जे चित्र उभे राहते त्यापेक्षा हेमांगीचे वास्तव अधिक वेदनादायी होते.
हेमांगीच्या होम व्हिजिट नंतर मला तिच्याबद्दल जास्त आत्मियता वाटू लागली. तिच्या निर्विकार वृत्ती मागे मानसिक असमतोल हे कारण तर होतच पण तिच्या शरीरातील संवेदन वाहक यंत्रणाही मतिमंदत्त्वामुळे क्षीण बनल्या होत्या त्यामुळेच आनंद, राग, दुःख संताप या साऱ्या भावकल्लोळापासून हेमांगी अनेक योजने दूर होती.
मी नेहमी म्हणते की, आमचे विद्यार्थी ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचलेले आहेत, ‘जाणिवा नेणीवांच्याही पलीकडे’ ते हेमांगी बाबत सत्यप्रत्ययाचं होतं
असे पाच सहा महिने गेले असतील हळूहळू हेमांगी इतर विद्यार्थी वर्गाबरोबर बडबड गीते म्हणण्यात, बालगीतांवर हातवारे करण्यात सहभागी होऊ लागली पण तरीही ती कधी हसायची नाही, रडायची नाही. स्थितप्रज्ञ होती खरी! आमच्या शाळेत मुले सतरंजीवर बाईंच्या भोवती गोलाकार बसलेली असत काही जण उठून खिडकीतून बाग बघत आकाशातले पक्षी न्याहाळता वर्गात मुलांना हालचालीचे स्वातंत्र्य होतं. सामान्य शाळेसारखी कडक शिस्त आमच्या विद्यार्थ्यांना सोसत नाही. त्यांच्या कलाकलाने मर्यादित शिस्तीत, ज्ञानाचे, वर्तनाचे कवडसे अलगद उघडावे लागतात.
त्यादिवशी हेमांगी खिडकीजवळ उभी होती. पावसाची चिन्हे होती. जोरात वारा सुटला होता. सुसाट वाऱ्याने एकाएकी खिडकीचे तावदान जोरात आपटले आणि आणि हेमांगीचे बोट खिडकीत सापडले तिच्या बाईचे लक्ष होते तिच्याकडे पण हे सार एका क्षणात
संध्या देवरूखकर
माजी प्राचार्या दिलासा
हेमांगी हसते तेव्हा…

माजी प्राचार्या – दिलासा